मुलांचे स्पोकन इंग्लिश सुधारण्यासाठीचे 3 सोपे उपाय

Posted by Neha Bhandari on Sep 22, 2021 10:47:54 AM
Neha Bhandari

Tags: Parents

Find me on:
English language

आजच्या जागतिकीकृत जगात, इंग्रजी ही विविध गटातील संवाद साधण्याची प्रमुख भाषा झाली आहे. या जगात प्रभावीपणे काम करण्यासाठी स्पोकन इंग्लिश हे एक अत्यावश्यक कौशल्य झाले आहे. बऱ्याचश्या भारतीय शाळांमध्ये शालेय इंग्रजीचे शिक्षण हे केवळ परीक्षा पास करण्यापुरतेच सीमित केले जाते. या परीक्षांमध्ये सुद्धा फक्त इंग्रजीचे वाचन, लिखाण व व्याकरण यावरच लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला स्पोकन इंग्लिशचे किती ज्ञान आहे हे तपासले जात नाही. बऱ्याच भारतीय विद्यार्थ्यांमध्ये स्पोकन इंग्लिशचे कौशल्य विकसित न होण्याचे हेच प्रमुख कारण आहे.

या लेखामधून आम्ही तुम्हाला ३ सोपे उपाय सांगणार आहोत, जेणेकरून तुमचे पाल्य अधिक चांगले इंग्रजी बोलू शकेल.

बोला, थोडे आणखी बोला आणि बोलत राहा:


चांगले इंग्रजी बोलण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ‘बोलणे’. बरेचसे भारतीय पालक अस्खलित इंग्रजी बोलू शकत नसल्याने ते त्यांच्या मुलांचा इंग्रजी बोलण्याचा सराव घेऊ शकत नाहीत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगणे खूप महत्वाचे आहे की जेवढे शक्य असेल तेवढे शाळेतच त्यांच्या मुलांनी इंग्रजी बोलावे. शाळेमध्ये विद्यार्थी आपल्याच वयोगटातील मुलांबरोबर असल्याने ते एकमेकांशी न घाबरता इंग्रजीमध्ये संवाद साधू शकतात. चांगल्या मित्र-मैत्रिणींच्या गटात ते एकमेकांना त्यांच्या चुका अगदी सहज हसत-खेळत सांगू शकतात व त्या चुका सुधारू सुद्धा शकतात. तुम्ही तुमच्या मुलांना इंग्रजी बोलणारे गट तयार करायला प्रोत्साहन द्या.

तुम्ही तुमच्या मुलांना आठवड्यातून एकदा त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्याचे प्रयोजन करून देऊ शकता. तिथे ते एकमेकांशी पूर्वनियोजित विषयावर इंग्रजी भाषेतून चर्चा करू शकतील. उदाहणार्थ ते आठवड्यामध्ये कोणती चित्रफीत अथवा सिनेमा पाहायचे हे आधी ठरवून घेतील आणि आठवड्याच्या शेवटी त्यातील त्यांना काय आवडले अथवा नाही आवडले यावर इंग्रजी भाषेतून चर्चा करतील. इंग्रजीचा सराव करण्यासाठी ही खूप चांगली संधी ठरेल व त्यांना हे करताना मजा पण येईल.

मुलांचा शब्दसंग्रह वाढवा:

(Description: फ्लॅशकार्डचा एक सेट)

कोणतीही भाषा व्यवस्थित बोलायची असेल, त्या भाषेमध्ये स्वतःला व्यक्त करायचे असेल तर तुम्हाला त्या भाषेमधील शब्द व्यवस्थित माहित असायला लागतात. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी इंटरनेट वर बरेच निशुल्क स्रोत तुम्हाला सापडतील. गुगलवर ‘How to improve English vocabulary’ असे टाईप करा. तुम्हाला बरेच उपयुक्त स्रोत मिळतील. बऱ्याच संसाधनांची माहिती असण्यापेक्षा, एखाद्या संसाधनाचा तुम्ही कशाप्रकारे वापर करता हे जास्त महत्वाचे आहे. एका वेळी खूप साऱ्या वेबसाईटचा वापर करू नका. त्यातील काही निवडक अशा वेबसाइटवरून अभ्यास करा, व त्यांनी सांगितलेल्या सूचनांचे व्यवस्थित पालन करा.

शब्दसंग्रह वाढवण्यासाठीचा एक सोपा उपाय म्हणजे फ्लॅशकार्ड बनवणे. उदाहरणार्थ तुमच्या मुलाचे 3 महिन्यात 100 नवीन शब्द शिकण्याचे ध्येय असेल, तर मुलांना चार्ट पेपर व स्केचपेनचा उपयोग करून प्रत्येक शब्दासाठी एक फ्लॅशकार्ड बनवायला सांगा. प्रत्येक फ्लॅशकार्डच्या एका बाजूला एक नवीन शब्द लिहा व दुसऱ्या बाजूला त्याचा अर्थ लिहा. मुलांना दररोज कमीत कमी 5 फ्लॅशकार्ड पुढे मागे बघायला सांगा. हे करायला जास्तीत जास्त 10-15 मिनिटे लागतील, परंतु ही पद्धत नियतमीतपणे अवलंबली तर मुलांचा शब्दसंग्रह नक्की वाढेल.

नवीन शिकलेल्या शब्दांच्या विश्लेषणासाठी तुम्ही तुमच्या घरात एक रंगीत ‘वर्ड-वॉल’ बनवू शकता. जेव्हा पण तुमचा पाल्य एखादा नवीन शब्द शिकेल तेव्हा त्याला त्या शब्दाचे एक छोटे रंगीत कार्ड बनवायला सांगा आणि ते कार्ड त्या वर्ड वॉल वर लावायला सांगा. अशा पद्धतीने तुमचा पाल्य त्याच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये सुद्धा नवीन शब्दांचा सराव करू शकेल.

(Description: 'वर्ड वॉल' चा एक नमुना)

शुद्ध उच्चारणावर मेहनत करा:

 

(Source: गूगल. Description: गूगलवर उच्चारणाबद्दल शोधले असता प्राप्त झालेला नमुना)

स्पोकन इंग्लिशमध्ये प्राविण्य मिळवायचे असेल तर शुद्ध उच्चारण अनिवार्य आहे. असे आवश्यक नाही की तुमच्या पाल्याने ब्रिटिश अथवा अमेरिकी लकबीमध्ये बोलले पाहिजे. परंतु शब्दांचे अचूक उच्चारण करणे अत्यंत महत्वाचे आहे. उदाहरणार्थ बरेचसे भारतीय ‘often’ या शब्दाचा उच्चार चुकीचा करतात. बरेचसे लोक ‘ऑ-फन’ असा उच्चार करण्याऐवजी ‘ऑफ-टन’ असा उच्चार करतात.

तुम्ही चुकीचे उच्चारल्या जाण्याऱ्या इंग्रजी शब्दांवर एक-एक करून काम करू शकता, ज्यामुळे ते उच्चार अचूक होतील. गुगलवर ‘_______ pronunciation’ असे टाईप करा व गुगल तुम्हाला सांगेल की त्या शब्दाचा उच्चार कसा केला जातो. तुम्ही ड्रॉप डाउन मेनूमध्ये तुमची आवडती लकब सुद्धा निवडू शकता. जसे की भारतीय, अमेरिकी अथवा ब्रिटिश लकबीमध्ये तुम्ही त्या शब्दाचा अचूक उच्चार ऐकू शकता.

लहान मुलांना भाषा शिकणे फारसे अवघड नसते. त्यांना केवळ नियमित अभ्यास व सकारात्मक वातावरणाची गरज असते. मुलांना स्पोकन इंग्लिश शिकवण्यासाठी तुम्ही जी कोणती पद्धत अवलंबाल, त्यात काही मजेशीर घटक समाविष्ट करायाला विसरू नका. अशा पद्धतीने तुमचा पाल्य काही काळातच स्पोकन इंग्लिश मध्ये नक्की प्रगती करेल.

LEAD चा English Language and General Awareness (ELGA) programme मुलांमध्ये इंग्रजीचे कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतो व मल्टि-एज वर्गात एक लेवल बेस्ड दृष्टिकोनाचा उपयोग करतो. पालक व मुले यांच्यासाठी LEAD विविध ठिकाणाहून मुलाखत आयोजित करतो, ज्यामुळे त्यांच्या इंग्रजीच्या ज्ञानाचे विश्लेषण करता येते आणि त्यांची किती प्रगती झाली आहे व त्यांना अजून किती शिकायचे आहे हे कळते. LEAD पालकांना जो रिपोर्ट सादर करतो, त्यातील माहितीमुळे पालकांना आपल्या पाल्याच्या क्षमतेबद्दल अधिक चांगल्याप्रकारे समजायला मदत होते.

LEAD संचालित शाळेमध्ये आपल्या मुलांचे नाव नोंदवण्याकरिता: आजच हा फॉर्म भरा

About the Author
Neha Bhandari
Neha Bhandari

Neha Bhandari is a Brand Manager at LEAD. With a contribution in building brands across the media and BFSI industry, she has made it to the Pitch Marketing 30under30 list. She holds a postgraduate degree in Marketing from KJ Somaiya Institute of Management Studies & Research. Neha strongly believes that education is the biggest investment of a child's future and she wishes to revolutionise the ecosystem with LEAD.

LinkedIn
Give your school the LEAD advantage