मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यासाठीचे ३ सोपे उपाय

Posted by Neha Bhandari on Sep 1, 2021 10:55:05 AM
Neha Bhandari

Tags: Parents

Find me on:
3 ways to turn every child into a ‘math person'

संख्याविषयक जाणीव लहान मुलांमध्ये उपजतच असते. लहान वयातच मुलांना कळत असते की ‘अधिक’ किंवा ‘जास्त’ चांगले असते. तुम्ही जर त्यांच्यासमोर चॉकलेटचे दोन बॉक्स ठेवले तर मुले स्वतःहूनच तो बॉक्स निवडतील ज्यात जास्त चॉकलेट्स आहेत. समजा, एखादी वस्तु मुलांचा हात पोहोचणार नाही इतक्या उंच जागेवर ठेवली तर ती वस्तु घेण्यासाठी मुले स्वतः आपल्या कुटुंबातील मोठ्या माणसाचे साहाय्य मागतात. यावरून लहान मुलांना उंचीच्या बाबतीत कमी किंवा जास्त असा अंदाज करता येतो हे दिसून येते. ही सर्व उदाहरणे लहान मुलांमध्ये संख्येविषयी एक जन्मजात जाणीव असते असे दर्शवितात.

तथापि संख्येविषयी ही जन्मजात जाणीव असताना देखील समाजातील एक मोठा वर्ग गणिताला एक कठीण विषय मानतो. अनेक मुलांना गणित हा विषय एखाद्या ओझ्यासारखा वाटतो. असे का?

आत्मविश्वासाची कमतरता, गणिताला सोप्या भाषेत समजावून देणाऱ्या पुस्तकांचा अभाव, इत्यादी या मागची प्रमुख कारणे असतात. शिक्षक व पालकांच्या थोड्याशा सजगतेने या समस्यांचे निवारण करता येऊ शकते. जेवढ्या लहान वयात मुलांसाठी असे प्रयत्न केले जातील, तेवढ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण होण्याची शक्यता वाढू शकेल.

गणितामधील कौशल्य केवळ तांत्रिक व्यवसायाकरिताच उपयुक्त आहे असे नसून, हे एक असे महत्वपूर्ण कौशल्य आहे की जे प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन जीवनात सुद्धा उपयोगी पडते. ज्या लोकांमध्ये हे गणिताचे कौशल्य बऱ्यापैकी असते, त्यांचे विचार बहुतेक घटनांमध्ये तर्कसंगत असतात व या गोष्टीचा त्यांना त्यांच्या आयुष्याच्या अनेक पैलूंमध्ये फायदा देखील होतो.

जर तुम्हाला मुलांमध्ये गणिताविषयी आवड व त्यात प्राविण्य निर्माण करायचे असेल तर पुढील लेख वाचा:

 1. गणिताला आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडा:
  500 rupees note
  पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही बाजारात वस्तु खरेदी करण्यासाठी जाल, तेव्हा मुलांना सोबत घेऊन जा. त्यांना प्रत्येक वस्तुच्या किमतीवर लक्ष ठेवण्यास सांगा आणि प्रत्येक नवीन वस्तु घेताना मनातल्या मनात त्या वस्तूंच्या किंमतींची बेरीज करायला सांगा. खरेदी पूर्ण झाल्यावर खरेदीची एकूण रक्कम किती झाली ते मुलांना विचारा. उत्तर बरोबर आल्यास त्यांना एखादे छोटे बक्षिससुद्धा द्या.

  आपण घरातील दैनंदिन कामे करतानासुद्धा मुलांना गणितामध्ये निपुण करू शकता. उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही स्वयंपाकाची तयारी करणार असाल त्यावेळी स्वयंपाकाला लागणारे विविध घटकपदार्थ त्यांना आणायला सांगा. जसे की 2 कांदे, 1 कप तांदूळ, ½ कप डाळ, 3 कप पाणी, इत्यादी. या खेळाला तुम्ही आणखी आव्हानात्मक बनवू शकता, जर तुम्ही त्यांना असे विचारले की जास्त लोकांकरिता जेवण बनवायचे असेल तर आणखी किती जास्त सामग्री आणावी लागेल. असे लहान खेळ आपण प्रौढांना खूप सोपे वाटतील, परंतु त्यामुळे मुलांना जाणवू लागेल की गणित हा काही काल्पनिक विषय नाही, तर आपल्या जीवनाचा एक अभिन्न अंग आहे.
 2. पाठ्यपुस्तकांपेक्षा खेळांचा (पझल गेम्सचा) वापर करा
  game of dice addition
  गणित फक्त पाठ्यपुस्तकांमधून शिकण्याची गोष्ट नव्हे. जर मुलांना शिकण्यासाठी केवळ पाठ्यपुस्तक हा एकमात्र पर्याय असेल तर गणित हा अत्यंत कंटाळवाणा व भीतीदायक विषय होऊ शकतो. म्हणून छोट्या-छोट्या पझल गेम्समधून (कोड्यांमधून) तुम्ही मुलांना संख्यांची ओळख करून द्या. पाठ्यपुस्तकांचा वापर फक्त गणिताचे नियम शिकवण्यासाठीच करा. याकरिता तुम्हाला महागडे शैक्षणिक खेळ विकत घेण्याची आवश्यकता नाही. गणिताचे कितीतरी सोपे व मनोरंजक खेळ इंटरनेटवर निशुल्क उपलब्ध आहेत.

  उदाहरणार्थ जर तुमचे मूल अंकगणित शिकत असेल तर लुडोचे फासे आणि चार्ट पेपरचा उपयोग करून तुम्ही एक सोपा खेळ बनवू शकता. खाली दिलेल्या चित्राप्रमाणे चार्ट पेपरवर आयताकृती चौकोन (रेक्टअँगल्स) आखा. प्रत्येक ओळीच्या पहिल्या दोन आयताकृती चौकोनांच्या मधोमध बेरजेचे (+) चिन्ह काढा आणि दुसऱ्या व तिसऱ्या आयताकृती चौकोनांच्या मधोमध बरोबरचे (=) चिन्ह काढा. आता तुमच्या मुलाला 2 वेळा फासे फेकण्यास सांगा. फास्यावर ज्या संख्या दिसतील त्या पहिल्या दोन आयताकृती चौकोनात लिहा. नंतर मुलांना या संख्यांची बेरीज करण्यास सांगून ओळीतील तिसऱ्या आयताकृती चौकोनात लिहिण्यास सांगा. अशा रीतीने बाकीच्या ओळी भरून घ्या. तुम्ही या खेळामध्ये बेरजेशिवाय वजाबाकी (-), गुणाकार (x) किंवा भागावर (÷) या चिन्हांचा देखील उपयोग करू शकता. अशा छोट्या-छोट्या खेळांमधून तुम्ही मुलांच्या गणिताचे आकलन करून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये एक मनोरंजक तत्वाचा समावेश करू शकता.
 3. शालेय परीक्षांच्या निकालांनी फार अस्वस्थ होऊ नका
  A child writing exams
  गणितासारख्या कठीण वाटणाऱ्या विषयाच्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळविल्यावर काही पालक आपल्या मुलांना शाबासकी देतात आणि न मिळाल्यास नाराजीसुद्धा व्यक्त करतात. ही रणनीती (स्ट्रॅटेजि) काही मुलांच्या बाबतीत उपयुक्त ठरते, परंतु मुलांना प्रेरित करण्यासाठी हा काही आदर्श उपाय नाही. मुलांना परीक्षेची भीती न बाळगता गणितामध्ये स्वतःहून आवड निर्माण करण्यात मदत करा. जर ते एखाद्या परीक्षेमध्ये फार चांगले मार्क मिळवू शकले नाहीत तरी कोणतेही शॉर्टकट शिकण्यासाठी त्यांच्यावर जोर जबरदस्ती करू नका. शालेय परीक्षेच्या निकालापेक्षाही पुढे भावी आयुष्यात गणितामुळे मिळालेली तार्किक क्षमता त्यांना जास्त उपयोगी पडू शकेल. मुलांना ही गोष्ट समजणे अत्यंत आवश्यक आहे की चुका करणे हे शिकण्याच्या प्रक्रियेचे एक अनिवार्य घटक आहे.

  वेळेत व अचूक मार्गदर्शनाने मुलांच्या मनातील गणिताबद्दलची भीती काढून टाकणे शक्य आहे. पालक व शिक्षकांच्या संघटित प्रयत्नांनी निश्चितच मुलांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण करता येऊ शकते.

  वर्तमानकाळात कोरोना महामारी मुलांच्या शिक्षणासाठी खूप मोठे आव्हान बनून समोर आली आहे आणि याचा सामना करण्यासाठी LEAD तुमच्या मदतीकरिता पुढे आले आहे. LEAD ने शाळेतील पाठ्यक्रमाला समजणे सोपे केले आहे. आईवडीलसुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये सहभागी होऊ शकतात. LEAD Student App च्या मदतीने विद्यार्थी हे प्रत्येक दिवशी लाईव्ह वर्गात भाग घेऊ शकतात, प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात व ताबडतोब आपल्या शंकांचे निरसन करू शकतात.

  डिजिटल लर्निंग कंटेन्ट, फिजिकल रीडर आणि वर्कबुक, लर्निंग अ‍ॅक्टिव्हिटी, ई-बुक्स, नियमित मूल्यांकन, पर्सनलाइज्ड रिव्हिजन, गृह अभ्यास, शंकांचे स्पष्टीकरण आणि राष्ट्रीय प्रतियोगिता ही LEAD ची इतर अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत.

LEAD मुलांना एका उज्ज्वल भविष्यासाठी तयार करते. LEAD संचालित शाळेमध्ये आपल्या मुलांचे नाव नोंदवण्याकरिताआजच हा फॉर्म भरा

About the Author
Neha Bhandari
Neha Bhandari

Neha Bhandari is a Brand Manager at LEAD. With a contribution in building brands across the media and BFSI industry, she has made it to the Pitch Marketing 30under30 list. She holds a postgraduate degree in Marketing from KJ Somaiya Institute of Management Studies & Research. Neha strongly believes that education is the biggest investment of a child's future and she wishes to revolutionise the ecosystem with LEAD.

LinkedIn
Give your school the LEAD advantage