घर बसल्या आपल्या मुलांची वाचनक्षमता कशी वाढवाल?

Posted by Manjiri Shete on Aug 18, 2021 10:51:10 AM
Manjiri Shete

Tags: Parents

Find me on:
Child and parent hand in hand

महामारीमुळे शाळा पूर्ण अथवा अंशतः बंद असल्याने मुलांच्या शिक्षणावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला आहे, विशेषतः लहान मुलांवर. काही मुलांचे तर संपूर्ण शिक्षणच ठप्प झाले आहे. युनेस्कोच्या एका संशोधनानुसार इयत्ता 1 ली ते 8 वीच्या मुलांमध्ये सुमारे 100 कोटी मुलांच्या शैक्षणिक कौशल्यामध्ये लक्षणीय घसरण पाहायला मिळाली आहे. 

हे स्वाभाविक आहे की ही घसरण भारतासारख्या विकसनशील आणि अन्य अविकसित देशांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळाली आहे. या देशांमध्ये मुलांच्या शिक्षणात शाळा अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतात. सद्यस्थितीत शाळेतील शिक्षकांचा खूप कमी प्रमाणात मुलांबरोबर संपर्क होत असल्यामुळे प्राथमिक शिक्षणापासून मुले वंचित होत आहेत. विशेषतः लहान मुलांमध्ये वाचनाचे कौशल्य विकसित होत नाही. याच कारणामुळे इतर विषयांचा अभ्यास समजण्यामध्ये सुद्धा मुले मागे पडत आहेत.

पालक मनापासून प्रयत्न करत आहेत की त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊ नये. याकारणास्तव ते आपल्या मुलांचे नाव विविध प्रकारच्या ऑनलाईन कार्यक्रमात नोंदवत आहेत. परंतु हे ऑनलाईन कार्यक्रम मुलांच्या सर्व शैक्षणिक गरजा  पुरवू शकत नाहीये. हे कार्यक्रम मुलांमध्ये मुलभूत वाचनाचे कौशल्य निर्माण करण्यात कमी पडत आहेत. पालकांसाठी हा अनुभव नवीन व आव्हानात्मक असल्याने त्यांना खूप असहाय्य वाटत आहे.

या आव्हानाला यशस्वीरित्या सामोरे जाण्यासाठी या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी 3 उपाय शोधले आहेत, जेणेकरून तुम्ही घर बसल्या सुद्धा तुमच्या मुलांचे वाचनाचे कौशल्य विकसित करू शकता: 

 •  चित्र असलेल्या पुस्तकांचा वापर जास्त करा:

  (वर्णन: अमर चित्रकथेसारखी रंगीत चित्रांनी परिपूर्ण असलेली पुस्तके मुले आवडीने वाचतात)

  शाळेतील पुस्तकांमध्ये चित्रांपेक्षा लेखन जास्त प्रमाणात आढळते. लहान मुलांना अशा पुस्तकांपेक्षा चित्रांनी परिपूर्ण असलेली पुस्तके जास्त आवडतात. विज्ञानाच्या भाषेत यांना व्हिज्युअल लर्नर असे म्हणतात. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पुस्तके खरेदी कराल तेव्हा अशी पुस्तके शोधा ज्याच्यामध्ये चित्रांची संख्या जास्त आहे किंवा त्यांना माहित असलेले एखादे कार्टून चरित्र आहे. अशी पुस्तके मुले स्वतः आवडीने वाचतील व त्यांच्या वाचनाच्या क्षमतेमध्ये देखील वाढ होईल. 

  •  ऑनलाईन वाचनाचे कार्यक्रम पहा:

   

  (वर्णन: Kids Academy सारखे बरेच चॅनेल यूट्युबवर मोफत बघायला मिळतात) 

  शाळेतील ऑनलाईन वर्गांच्या व्यतिरिक्त आजची मुले यूट्युब व डिस्नेसारख्या ऑनलाईन व्हिडिओ व्यासपीठावर खूप वेळ घालवितात. हे बघून काही पालक खूप त्रस्त होतात. परंतु पालकांनी हे समजून घ्यायला हवे की सगळ्याच प्रकारचा स्क्रीनटाईम वाईट नसतो. मुलांवर जोर जबरदस्ती न करता तुम्ही त्यांना शैक्षणिक कार्यक्रम पाहण्यास प्रोत्साहन देऊ शकता. गुगल किंवा यूट्युबवर ‘reading show for kids’ हे टाईप करुन शोधा. त्यामुळे तुम्हाला खूप चांगल्या कार्यक्रमांची लिंक मिळेल. हे कार्यक्रम तुमच्या मुलांसाठी दररोजचे मनोरंजन व प्रबोधनाचे साधन बनू शकतात.

  • अ‍ॅक्टिव्हिटी पुस्तके व पत्रकांचा उपयोग करा:

  (वर्णन: डिस्नेच्या वेबसाईट वरून अशी बरीच पत्रके तुम्हाला मोफत डाउनलोड करता येतील) 

  एक प्रसिद्ध चिनी म्हण आहे की “मी जे ऐकतो ते विसरून जातो, मी जे पाहतो ते मला लक्षात राहते, मी जे करतो ते मी समजून घेतो”. 

  मुले जे कार्य स्वतः करतात त्यांना त्याच्या मागची संकल्पना जास्त लवकर लक्षात राहते. अ‍ॅक्टिव्हिटी पुस्तके किंवा रंगीत पुस्तकांमधून अभ्यास करताना मुलांचे लक्ष विचलित होत नाही. अशी पुस्तके ऑनलाईन मोफत मिळतात व तुम्ही त्यांच्या प्रिंट्स काढून आपल्या मुलांना देऊ शकता. जर तुमच्यामध्ये कलेचे कौशल्य असेल तर तुम्ही ते स्वतः घरी बनवू शकता. अशा अ‍ॅक्टिव्हिटी तुमच्या मुलांची लिहायची व वाचनाची क्षमता वाढवण्यास मदत करतील. 

  • नित्य अभ्यासावर जोर द्या: 
   pexels-rodnae-productions-7104177-jpg

  वाचन वाढवण्यासाठी तुम्ही कितीही युक्त्या वापरल्या तरी नित्य अभ्यासाशिवाय मुलांच्या कौशल्यामध्ये वाढ होणे कठीण आहे. म्हणूनच दिवसातून कमीतकमी 15 ते 20 मिनिटे तुम्ही मुलांबरोबर बसून वाचन करा व त्यांना कुटुंबातील इतर सदस्यांना सुद्धा वाचून दाखवण्यासाठी प्रोत्साहित करा. 

  •  मुलांमध्ये आत्मविश्वास जागा करा:
   pexels-helena-lopes-4453089-jpg

  शाळेमध्ये मुले आपल्याच वयोगटातील वर्गमित्रांबरोबर एकत्र राहून अगदी सहज खूप गोष्टी शिकून जातात. अशा वातावरणात ते कोणत्याही दडपणाखाली नसल्यामुळे त्यांच्याकडून चुका देखील कमी होतात. परंतु ऑनलाईन वर्गामध्ये काही मुले खूप एकटी पडतात व त्यामुळे काही वेळा त्यांच्यामधील आत्मविश्वास देखील कमी होतो. छोट्या-छोट्या चुकांमुळे ते निराश होतात. या सगळ्यापासून वाचण्यासाठी त्यांच्या छोट्या-छोट्या यशाचे सुद्धा कौतुक करा व सतत त्यांचा आत्मविश्वास वाढवत रहा. प्रत्येक आठवड्याला तुम्ही मुलांना स्वतः एक सर्टिफिकेट बनवून द्या किंवा एखादे छोटे बक्षीस द्या. 

  या लेखातून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणपद्धतीशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल. जोपर्यंत ही मुले ही नवीन पद्धत पूर्णपणे आत्मसात करत नाहीत, तोपर्यंत एक पालक या नात्याने आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना शक्य ती मदत करावी आणि त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये. यासाठी पालकांनी शिक्षकांबरोबर एक टीम म्हणून अशा पद्धतीने काम केले पाहिजे. शिक्षक आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे मुले निश्चितच ही कठीण वेळ हसतखेळत अगदी सहज पार करतील. 

  वर्तमानकाळात ही महामारी मुलांच्या शिक्षणासाठी खूप मोठे आव्हान बनून समोर आली आहे आणि याचा सामना करण्यासाठी LEAD तुमच्या मदतीकरिता पुढे आले आहे. LEAD ने शाळेतील पाठ्यक्रमाला समजणे सोपे केले आहे. आईवडीलसुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये सहभागी होऊ शकतात. LEAD Student App च्या मदतीने विद्यार्थी हे प्रत्येक दिवशी लाईव्ह वर्गात भाग घेऊ शकतात, प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात व ताबडतोब आपल्या शंकांचे निरसन करू शकतात. 

  डिजिटल लर्निंग कंटेन्ट, फिजिकल रीडर आणि वर्कबुक, लर्निंग ऍक्टिव्हिटी, ई-बुक्स, नियमित मूल्यांकन, पर्सनलाइज्ड रिव्हिजन, गृह अभ्यास, शंकांचे स्पष्टीकरण आणि राष्ट्रीय प्रतियोगिता ही LEAD ची इतर अद्वितीय वैशिष्ट्ये आहेत.      

LEAD मुलांना एका उज्ज्वल भविष्यासाठी तयार करते. LEAD संचालित शाळेमध्ये आपल्या मुलांचे नाव नोंदवण्याकरिता: आजच हा फॉर्म भरा

About the Author
Manjiri Shete
Manjiri Shete

Manjiri is a Senior Content Marketing Executive at LEAD School. She loves reading to the point where a good book has made her skip social gatherings that witness her not-so-funny attempts at being funny. She has an inclination towards travelling, fashion, art and eating doughnuts.

LinkedIn
Give your school the LEAD advantage